ETV Bharat / bharat

'मी पुतीन यांच्याशी काय बोलेल, हे तुमचे काम नाही'; ट्रम्प यांनी पत्रकारांना सुनावले - us

जी-२० शिखर परिषदेसाठी जपानला रवाना होताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी 'मी पुतीन यांच्याशी काय बोलेल हे तुमचे काम नाही' या शब्दात त्यांनी पत्रकारांना सुनावले आहे.

ट्रम्प
author img

By

Published : Jun 27, 2019, 9:26 AM IST

Updated : Jun 27, 2019, 9:44 AM IST

ॉशिंग्टन - जी-२० शिखर संमेलन जपानमधील ओसाका येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थिती लावणार आहेत. शिखर परिषदेसाठी जपानला रवाना होताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी 'मी पुतीन यांच्याशी काय बोलेल हे तुमचे काम नाही', अशा शब्दात त्यांनी पत्रकारांना सुनावले.

जी-20 शिखर संमेलनामध्ये इतर देशांचे प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट होण्याची शक्यता आहे. ट्रम्प आणि पुतीन यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असणार आहे. या भेटीत युएसचे इराणसोबतचे संबध, सिरीयामधील समस्या, अशा आंतराष्ट्रीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिखर परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचीदेखील भेट घेणार आहेत.

जी -20 परिषदेत भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूके आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 27, 2019, 9:44 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.