ETV Bharat / bharat

विशेष : मुस्लीम बांधव तयार करतात मंदिर, सुंदर नक्षीकाम अन् कलाकुसर पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित - मंदिर बनवणारे मुस्लिम हाथ बातमी

सहारनपूर मध्ये मंदिर बनवणाऱ्या कारागिरांपैकी 90 टक्क्यांहून अधिक जण मुस्लिम समाजाचे आहेत. हा व्यवसाय ते पिढ्यांपासून करत असल्याचे सांगतात. जात-धर्म जरी वेगवेगळे असले तरी श्रद्धा मात्र, एकच आहे. मंदिर बनवताना देवाची सेवा करत असल्याची प्रचिती येत असल्याचे भाव मंदिर तयार करणाऱ्या कारखान्याचे मालक मोहम्मद इरशाद व्यक्त करतात.

मंदिर बनवणारे मुस्लिम हाथ
मंदिर बनवणारे मुस्लिम हाथ
author img

By

Published : Oct 29, 2020, 6:07 AM IST

सहारनपूर (उत्तर प्रदेश) - आपला देश हा विविधतेत एकतेच्या रुपाने ओळखला जातो. विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या काही लोकांची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सहारनपूरमध्ये एक नाही तर अशा हजारो नागरिकांत आपल्याला एकतेचं दर्शन घडेल. हे तुमच्या आमच्या सारखेच सामान्य नागरिक आहेत. वूडन कार्विंगच्या व्यवसायाशी जुळलेले हे लोकं सुंदर नक्षीकामातून देवाचं मंदिर घडवतात. विषेश म्हणजे या व्यवसायातील 90 टक्क्याहुन अधिक नागरिक हे मुस्लिम समाजातील आहेत.

मुस्लिम बांधव तयार करतात मंदिर

त्यांनी बनवलेली मंदिर आणि त्यावरील नक्षीकाम इतके सुरेख असते की ते पाहतच राहावे असे वाटते. हा व्यवसाय येथील कारागिर पिढीदर पिढी करत असल्याचे सांगतात. जात-धर्म जरी वेगवेगळे असले तरी श्रद्धा मात्र, एकच आहे. मंदिर बनवताना देवाची सेवा करत असल्याची प्रचिती येत असल्याचे भाव मंदिर तयार करणाऱ्या कारखान्याचे मालक मोहम्मद इरशाद व्यक्त करतात.

या मंदिरांसाठी शिसम, सागवान, कडूलिंबाचे लाकूड वापरण्यात येते. या बनलेले हे मंदिर १० ते १५ वर्षापर्यंत टिकतात. मंदिरांवर ॐ आणि स्वास्ति अतिशय सुरेखपणे कोरले जाते. आपला धर्म वेगळा असला तरी भक्तीचे भाव मात्र, सच्चे असल्याची भावना कारागिर व्यक्त करतात. मात्र, काही कट्टरवादी लोकांचा त्यांच्या या कामाला विरोध असून ते यावर आक्षेप घेतात. परंतु, लोकांकडे दुर्लक्ष करत मोहम्मद इरशाद यांचे मंदिर बनवण्याच काम अविरतपणे सुरू आहे.

आज त्यांच्या मंदिरांना देशभरातच नव्हे तर विदेशातही भरपूर मागणी आहे. भारताबाहेर अमेरिका, इग्लंडवरुनही इरशाद यांना मंदिरांच्या ऑर्डर येतात. मलेशयातही मंदिरांना खूप मागणी असल्याचे ते सांगतात. जुम्मा आणि इदला नमाजसाठी उठणारे हाथ मंदिर बनवत सामाजिक एकतेचा संदेश देत आहेत. हेच भारतीय संस्कृतीचं प्रतिक असून धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांच्या तोंडावर एक जोरदार चपराक आहे. या कारागिरांच्या कामातून आपल्याला उत्कृष्ट मंदिरांसह हिंदू-मुस्लिम एकतेच एकतेचं दर्शनही घडते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.