ETV Bharat / bharat

३ वर्षाच्या मुलामुळे उघड झाले आईच्या मृत्यूचे रहस्य - Murder mistery

विवाहबाह्य संबंधातून एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली. मात्र, ही घटना हत्या असल्याचे तिच्या ३ वर्षीय मुलाकडून कळल्यावर पोलिसांनी तपास करत आरोपीस अटक केली.

banglore
३ वर्षाच्या मुलामुळे उघड झाले आईच्या मृत्यूचे रहस्य
author img

By

Published : Dec 3, 2019, 9:47 PM IST

बंगळुरू - येथील एका महिलेची तिच्या प्रियकराने विवाहबाह्य संबंधातून हत्या केली होती. मात्र, हत्येचे कारण तिच्या ३ वर्षीय मुलामुळे उघड झाले आहे. सुमनलता असे या महिलेचे नाव असून व्यंकटेश असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी व्यंकटेशला अटक केली असून महिलेच्या ३ वर्षीय मुलामुळे या हत्येचे रहस्य उलगडले आहे.

सुमनलताचे देवराज नावाच्या व्यक्तीशी लग्न झाले होते, त्या दोघांना २ मुले आहेत. मात्र, लग्नानंतरही सुमनलताचे व्यंकटेश नावाच्या व्यक्तीशी प्रेम प्रकरण होते. तो तिला सर्व सोडून त्याच्याबरोबर येण्याकरता त्रास द्यायचा. पण सुमनलता ही मुलांमुळे व्यंकटेशबरोबर जाण्यास नकार देत होती. तर, सुमनलताचा नवरा देवराज याचेही दुसरीकडे प्रेमप्रकरण होते. यामुळे व्यंकटेशने सुमनलताला सोबत येण्याकरता आणखी त्रास देणे सुरू केले.

हेही वाचा - INX मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

एके दिवशी तो सुमनलताकडे आला आणि तिला सोबत येण्याकरता मागे लागला, मात्र तिने सोबत येण्यास नकार दिला. यामुळे रागाच्या भरात व्यंकटेशने साडीने गळा आवळून तिची हत्या केली आणि निघून गेला. मात्र, यावेळी तिचा ३ वर्षाचा मुलगा तिथेच होता आणि सर्व पाहत होता.

हेही वाचा - एचडीएफसीची नेट बँकिग, मोबाईल अॅप सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद.. ग्राहकांना मनस्ताप

सुमनलताच्या घरच्यांनी तिला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला असे समजून तिचा अंत्यविधी केला. नंतर घरी आल्यावर मुलासाठी बांधण्यात आलेल्या झोपाळ्यातील साडी गायब होती. याबाबत लहान मुलाला विचारले असता त्याने घरी एक काका आले होते, त्यांनी आईचा गळा साडीने आवळला आणि निघून गेल्याचे सांगितले. यानंतर, लोकांनी पोलिसांना फोन करून बोलवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मुलाकडून माहिती घेतली. यानंतर, तपास सुरू करून व्यंकटेशला अटक करण्यात आली.

हेही वाचा - एकाने अडवला चक्क संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा ताफा अन् म्हणाला..

Intro:Body:

Murder mistery solved by a 3 year old kid?

A man Venkatesh in bangalore who had killed married women Sumalatha in front of her kid is now being arrested.

A married women strangled to death by her boyfriend in front of her kid.

People believed that the women died due to heart attack. But when they came to know a bag made of saree is missing, they asked the child about this. The child said, 'Uncle had come, he wrapped saree around mother's neck'. This gave a clue and police arrested the accused.

Sumalatha was married to Devaraj and they had to children. Even Devaraj had an affair. Sumalatha's boyfriend Venkatesh was torturing her to leave the children. When she denied, Venkatesh killed her.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.