ETV Bharat / bharat

गाझीपूर : बाहुबली आमदार मुख्तार अंसारींचे हॉटेल 'गजल' जमीनदोस्त.. जिल्हा प्रशासनाची कारवाई - गाझीपूर बातमी

गाझीपूरमध्ये मुख्तार अंसारी यांच्या पत्नी व मुलांच्या 'गजल' या हॉटेलवर आज जिल्हा प्रशासनाने बुलडोजर चालवले. या कारवाईवेळी एसडीएम एसपींसह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

mukhtar-ansari-hotel-gazal-demolished
मुख्तार अंसारींचे हॉटेल 'गजल' जमीनदोस्त
author img

By

Published : Nov 1, 2020, 5:11 PM IST

गाझीपूर - जिल्ह्यातील बाहुबली आमदार मुख्तार अंसारी यांचे हॉटेल 'गजल' वर रविवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने कारवाई करत हॉटेल जमींनदोस्त केले. शनिवारी डीएमच्या अध्यक्षतेखालील आठ सदस्यीय बोर्डाने हॉटेलमालक मुख्तार अंसारी यांची पत्नी व मुले अब्बास आणि उमर अंसारी यांची याचिका धुडकावून लावली. त्यानंतर आज सकाळी जिल्हा प्रशासनाने हॉटेलवर बुलडोझर चालवले. या हॉटेलची मालकी मुख्तार अंसारी यांची पत्नी व त्यांच्या दोन मुलांच्या नावावर आहे.

मुख्तार अंसारींचे हॉटेल 'गजल' जमीनदोस्त

याचिका लावली धुडकावून -

एसडीएम सदर प्रभास कुमार यांनी आठ ऑक्टोबर रोजी हॉटेलला नोटीस पाठवले होते. या नोटीसनंतर मुख्तार अंसारी यांच्या पत्नी व मुलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना डीएमसमोर आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. शनिवारी डीएमच्या अध्यक्षतेखालीली बोर्डाने मुख्तार अंसारी यांच्या पत्नी व मुले आणि उमर अंसारी यांची याचिका नामंजूर केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्‍यक्षतेखालील बोर्डाने आपल्या आदेशात म्हटले आहे, की याचिकाकर्त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य नसल्याने त्यांची याचिका नामंजूर करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाचे पथकाने हॉटेलवर कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.