ETV Bharat / bharat

'हरित क्रांती'च्या जनकाचा जन्मदिन: तीस लाख भुकबळी पाहिलेल्या स्वामीनाथन यांनी भारताला केले अन्नधान्य संपन्न - भारतीय हरित क्रांतीचे जनक

1943 सालच्या बंगामधील दुष्काळात तब्बल 30 लाख नागरिकांचा भूकेमुळे मृत्यू झाला. या घटनेने स्वामीनाथन यांचे मनपरिवर्तन झाले. त्यांनी कृषी क्षेत्रात संशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्रिवेंद्रम येथे महाराजा कॉलेजातून स्वामीनाथन यांनी प्राणीविज्ञान शास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर मद्रास कृषी महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

swaminathan
एस. स्वामीनाथन
author img

By

Published : Aug 7, 2020, 5:23 PM IST

Updated : Aug 7, 2020, 6:12 PM IST

हैदराबाद - आज भारतीय हरित क्रांतीचे जनक मनकोंबू संमबासिवन स्वामीनाथन यांचा 95 वा वाढदिवस आहे. 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूतील कुंभकोनम येथे स्वामीनाथन यांचा जन्म झाला. ते एक विख्यात अणुवंशशास्त्रज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ आहेत. भारतीय कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वामुळे भारत अन्यधान्यात स्वयंपूर्ण झाला.

स्वामीनाथन यांचे वडील शल्यचिकित्सक म्हणजेच सर्जन होते. तसेच ते महात्मा गांधीच्या मार्गावर चालणारे होतेे. तामिळनाडूतील स्वदेशी आणि मंदिर प्रवेश चळवळीमध्ये त्यांच्या वडीलांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे सेवाभाव स्वामीनाथन यांच्या मनात लहानपणापासून रुजला.

स्थानिक शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. मात्र, 1943 सालच्या बंगामधील दुष्काळात तब्बल 30 लाख नागरिकांचा भूकेमुळे मृत्यू झाला. या घटनेने स्वामीनाथन यांचे मनपरिवर्तन झाले. त्यांनी कृषी क्षेत्रात संशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्रिवेंद्रम येथे महाराजा कॉलेजातून स्वामीनाथन यांनी प्राणीविज्ञान शास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर मद्रास कृषी महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथून त्यांनी कृषीविज्ञान विषयात दुसऱ्यांदा पदवी घेतली. त्यानंतर कृषी संशोधन संस्था( (IARI) दिल्ली येथे प्लांट ब्रिडिंग आणि जेनेटिक्स विषयात पद्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

हेही वाचा - 'नव्या शैक्षणिक धोरणाला कुणीच भेदभावजनक न ठरवणे ही आनंदाची गोष्ट'

स्वामीनाथन यांनी प्राणीविज्ञान शास्त्र आणि कृषी या दोन विषयातील पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर स्वामीनाथन केंद्रिय लोकसेवा आयोगाची परीक्षाही पास झाले. आयपीएस पदी त्यांची निवड झाली असतानाही त्यांनी युनिस्कोद्वारे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीवर नेदरलँडला जाण्याचा निर्णय 1948 साली घेतला. पुढे त्यांनी भारतात येऊन कृषी क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. एकेकाळी गव्हाची आयात करणारा भारत गव्हामध्ये स्वयंपूर्ण झाला. त्याचरोबर तांदळातही भारताने विक्रमी उत्पादन घेतले. स्वामीनाथन यांच्यावर श्री अरबिंदो या बंगाली तत्ववेत्त्याचा मोठा प्रभाव आहे. भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 ला त्यांनी श्री अरबिंदोे आश्रमाला भेट दिली होती.

  • बटाटा, गहू, तांदुळ आणि जुटवरील संशोधनासाठी स्वामीनाथन यांना ओळखले जाते.
  • 1972 ते 1979 या काळात स्वामीनाथन यांनी इंडियन कौन्सिल ऑफ अ‌ॅग्रिकल्चर रिसर्च संस्थेच्या महासंचालक पदाचा कार्यभार पाहिला. तर 1982 ते 88 या काळात ते इंटरनॅशनल राईस इन्स्टिट्युटच्या महासंचालकपदी होते.
  • 1979 साली त्यांनी भारताच्या कृषी मंत्रालयात मुख्य सचिव म्हणून कार्यभार पाहिला.
  • 1988 साली स्वामीनाथन ‘इंटरऩॅशनल युनियन ऑफ द कन्झर्वेशन ऑफ नेचर अ‌ॅन्ड नॅचरल रिसोर्सेस' या संस्थेचे अध्यक्ष बनले.

Last Updated : Aug 7, 2020, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.