ETV Bharat / bharat

रात्री डॉक्टरांनी 'त्याला' मृत घोषित केले, अन् दुसऱ्या दिवशी...

या वृद्ध व्यक्तीवर पुन्हा लगेचच उपचार सुरू करण्यात आले खरे, पण त्याचा उपयोग झाला नाही. कदाचित रात्रीच उपचार मिळाले असते, तर तो वाचण्याची शक्यता होती.

किशन काशीराम
author img

By

Published : Jun 22, 2019, 11:58 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशातील बीना टाऊन येथील शासकीय रुग्णालयात काहीसा विचित्र प्रकार घडला. येथे एका ७२ वर्षीय रुग्णाला डॉक्टरांनी रात्री मृत घोषित केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी तो चक्क उठून रडू लागला! गुरुवारी रात्री मृत घोषित केलेली व्यक्ती शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनासाठी नेले जात असताना जिवंत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर डॉक्टरांची धावाधाव सुरू झाली.

या वृद्ध व्यक्तीवर पुन्हा लगेचच उपचार सुरू करण्यात आले खरे, पण त्याचा उपयोग झाला नाही. कदाचित रात्रीच उपचार मिळाले असते, तर तो वाचण्याची शक्यता होती. या वृद्धाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती डॉ. अविनाश सक्सेना यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता पोलिसांना कळवली होती. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनासाठी पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यावेळी वृद्धाचा श्वासोच्छवास सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतक्यात, तो रुग्ण जागा झाला आणि रडू लागला. हे पाहून डॉक्टरांची तारांबळ उडाली. त्यांनी तातडीने सलाईन लावून त्याच्यावर उपचार सुरू केले, पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

doctor
डॉ. आर. एस. रोशन
किशन काशीराम असे या व्यक्तीचे नाव आहे. ते रुग्णालयात एकटेच दाखल झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल काही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याचे मान्य केलेआहे. संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर एस रोशन यांनी स्पष्ट केले. एकीकडे डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा विषय चांगलाच तापला असताना, मध्य प्रदेशात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

Intro:Body:

-------------

किशन काशीराम असे या व्यक्तीचे नाव आहे. ते रुग्णालयात एकटेच दाखल झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल काही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याचे मान्य केलेआहे. संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर एस रोशन यांनी स्पष्ट केले. एकीकडे डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा विषय चांगलाच तापला असताना, मध्य प्रदेशात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचं धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.