सतना - मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात आणखी एकदा टेरर फंडिंग नेटवर्कचा भांडाफोड झाला. राज्य एटीएसने केलेल्या कारवाईत ५ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये बलराम सिंह हा आरोपीही आहे. त्याला 2017 मध्येही टेरर फंडिंग प्रकरणातच अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या इशाऱ्यांवर दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याचे काम करत होते.
अटक झालेले आरोपी सतनामधून अनेक राज्यांमध्ये नेटवर्क चालवत होते. त्यांच्याकडे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि 17 पाकिस्तानी फोन नंबर मिळाले आहेत. यांच्या माध्यमातून ते दहशतवाद्यांना पैसा पुरवत होते. सध्या पोलीस छतरपुरा आणि प्रयागराज येथे आणखी आरोपींच्या शोधार्थ पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आहे.