रतलाम (मध्यप्रदेश) : राज्यातील रतलाम जिलह्यात एका गावात विषारी दारूचे सेवन केल्याने सहा लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यापैकी 4 नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे दारूची दुकाणे बंद आहेत. मात्र, मद्यपींना दारूशिवाय जगणे जसे की असह्य होत आहे. त्यातूनच गावठी दारूकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यातूनच अनेक नागरिक अशा विषारी दारूचे सेवन करत आहेत.
रतलाम जिल्ह्यातील निमली या गावातील सहा नागरिकांना अशाच प्रकारे दारूचे सेवन केल्याने त्यांची तब्येत खालावली. अखेर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन जणांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ऋतुराज सिंग (35) विकी सिंग (21) जयसिंग सिंग (26) अर्जुन नाथ (22) अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा... राज्यातील कंटेनमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकाने सुरू होणार