हुबळी (कर्नाटक) - जिल्हा प्रशासनाने एका महिलेला तिच्या तीन कोरोनाबाधित मुलांसोबत राहण्याची परवानगी दिली आहे. सुरक्षा कीट वापरून ती महिला मुलांच्या वॉर्डमध्ये राहू शकेल.
गेल्या आठवड्यात जुन्या हुबळीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये तीन छोट्या मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर हुबळीच्या आयएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहे.
उपचारादरम्यान डॉक्टर आणि या मुलांचे वडील त्यांना सांभाळू शकत नव्हते. त्यानंतर डॉक्टर आणि कोरोनाबाधित कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाला महिलेला मुलांसमवेत राहू देण्याची परवानगी दिली.
जिल्हा प्रशासनाने महिलेला मुलांसमवेत राहण्याची परवानगी दिली आहे. यासोबतच राज्य सरकारने महिलेच्या सुरक्षेसाठी मास्क आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिले आहे.