ETV Bharat / bharat

'चांद्रयान- 2  मोहीम ९५ टक्के यशस्वी', ऑर्बिटर ७ वर्षे करणार चंद्राचा अभ्यास - chandrayaan - 2

चांद्रयान 2 मोहिमेमध्ये इस्त्रोद्वारे अनेक नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. त्यांची कार्यक्षमताही सिद्ध झाली.

चांद्रयान- 2
author img

By

Published : Sep 7, 2019, 10:35 PM IST

नवी दिल्ली - चंद्रापासून २ .१ किमी दूर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. मात्र, चांद्रयान २ मोहीम ९० ते ९५ टक्के फत्ते झाल्याचे सरकारने म्हटले आहे. ऑर्बिटर चंद्राभोवती फिरतच असून त्याद्वारे चंद्राबद्दल वैज्ञानिक माहिती जाणून घेण्यास मदत होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. तर विक्रम लँडरशी संपर्क साधण्यास १४ दिवसांता कालावधी लागू शकतो, असे इस्त्रोचे प्रमुख के. सिवान म्हणाले.

याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या विज्ञान विषयक सल्लागार के. विजय राघवन यांनी दिली. चांद्रयान २ मोहीम यशस्वी होण्याचे टप्पे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार ९० ते ९५ टक्के मोहीम यशस्वी झाल्याचे राघवन म्हणाले. या मोहिमेमध्ये इस्त्रोद्वारे अनेक नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. त्यांची कार्यक्षमाताही सिद्ध झाली. ही मोहीम खूप क्लिष्ट प्रकारामधील होती. शेवटच्या काही मिनिटापर्यंत सर्वकाही ठीक चालले होते. मात्र, २ किलोमीटरचे अंतर राहिले असताना संपर्क तुटला.

इस्त्रोचे संचालक के. सिवान यांनीही चांद्रयान २ मोहीम १०० टक्क्यांच्या खूप जवळ गेल्याचे म्हटले आहे. तरीही विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी १४ दिवसांचा काळ लागू शकतो, असे ते म्हणाले.

विक्रम लँडर जरी चंद्रावर उतरण्यात अपयशी झाले असले तरी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेमध्ये फिरत आहे. त्याद्वारे चंद्रावरील खनिजे, वातावरण आणि चंद्राच्या ध्रुवांचा अभ्यास करण्यात येईल असे राघवन म्हणाले. ऑर्बिटरवर बसवलेला कॅमेरा हा सर्वोत्तम क्षमतेचा असल्याचे ते म्हणाले. याआधीच्या चंद्र मोहिमेमध्ये असा कॅमेरा वापरण्यात आला नाही, असे राघवन म्हणाले. ऑर्बिटरचे आयुष्य ७ वर्षांचे असून त्याद्वारे चंद्राचा अभ्यास करता येईल, असे इस्त्रोने सांगितले.

Intro:Body:

nat

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.