नवी दिल्ली - कोरोना काळात भारताने वंदे भारत मिशन राबवले. या मिशनअंतर्गत आतापर्यंत 40 लाख लोकांना भारतात परत आणल्याचे पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. जगभरात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर लाखो नागरिक विविध देशांत अडकून पडले होते. त्यांना माघारी आणण्यासाठी भारताने हे मिशन सुरू केले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणूचा प्रकार समोर आल्यानंतर भारताने वंदे भारत मिशन थोड्याकाळासाठी रोखलं आहे. पराराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. याचबरोबर चाबहार बंदरावर इराण, उज्बेकिस्तान आणि भारत चर्चा करणार आहे. बैठकीची तारिख अद्याप ठरवण्यात आली नसून अफगाणिस्तानला हितधारकाच्या रुपात आमंत्रित केले आहे.
नेपाळवर प्रतिक्रिया -
नेपाळमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. नेपाळमध्ये पुढच्या वर्षात निवडणुका होणार आहेत. हे प्रकरण नेपाळचे अंतर्गत प्रकरण आहे. एक शेजारी म्हणून भारत शांती, समृद्धी आणि विकासासाठी नेपाळच्या लोकांचे नेहमची समर्थन करेल, असेही ते म्हणाले.
विविध टप्प्यात राबवले मिशन -
वंदे भारत मिशन अभियान विविध टप्प्यात राबविण्यात आले. विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 6 मेपासून वंदे भारत मिशन सुरू करण्यात आली आहे. कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, केनिया, श्रीलंका, फिलिपाईन्स, सौदी अरेबिया, बांगलादेश, थायलंड, दक्षिण अफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, म्यामनार, जपान, युक्रेन, व्हिएतनाम या देशातून भारतीयांना मायदेशी आणण्यात आले.