नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिशानिर्देश तत्वे जारी केले आहेत. सध्या घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपायांकडे लोकांचा कल जास्त प्रमाणात आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाकडूनही रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याासाठी आलं, हळद, व्यवनप्राश, काढा यांचे सेवन करण्याचे सांगितले आहे.
- करोनाचे विषाणू शरीरातून नष्ट झाले तरी रोगप्रतिकार शक्ती पुन्हा मजबूत व्हायला वेळ लागतो. त्यासाठी रुग्णांनी कोमट पाणी प्यावे. तसेच पौष्टिक अन्न खावे.
- योगासन, प्राणायम करावी. तसेच च्यवनप्राश, ज्येष्ठमध, अश्वगंधा, आवळा खावा.
- काही खाण्याआधी किंवा अन्नपदार्थांना स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
- कोरोनामुक्त झालेल्या लोकांनी हळुहळु काम सुरु करावे. पर्याप्त झोप घ्यावी, तसेच पचनास मदत करणारे अन्न खावे.
- धूम्रपान करू नये. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे औषधे घ्यावी.
गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 94 हजार 372 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.