लंडन - ब्रिटिश संसदेचे उच्च गृह 'हाउस ऑफ लॉर्ड'चे सदस्य नियुक्त करण्यात आलेले पहिले मुस्लीम खासदार लॉर्ड नजीर अहमद यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. अटल बिहारी वाजपेयी, मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क्रंमाक आहे, असे वादग्रस्त ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या जादू-टोना, तंत्र-मंत्राच्या वक्तव्यांमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गौर, सुषमा स्वराज, अटल बिहारी वाजपेयी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि अरुण जेटली या सर्वांचे एका वर्षाच्या आत निधन झाले. आता पुढचा क्रमांक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे, अशा मजकुराचे ट्विट नजीर अहमद यांनी केले आहे.
नजीर यांच्या वादग्रस्त वक्ताव्यावर तिखट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री किरण रिजूजू यांनी ट्विट करुन नजीर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अशा लोकांना ब्रिटिश संसदेत स्थान कसे मिळाले. नजीर यांनी लोकांना मॅनेज करुन संसदेत स्थान मिळवले आहे काय, असा सवाल त्यांनी केला आहे. रिजूजू यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.