ETV Bharat / bharat

बालाकोट एअर स्ट्राईकची माहिती मोदींनीच अर्णबला दिली - राहुल गांधी - काँग्रेस नेते राहुल गांधी

बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक होणार ही माहिती एका पत्रकारापर्यंत (अर्णब गोस्वामी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारेच पोहचली, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Jan 25, 2021, 5:26 PM IST

चेन्नई - अर्णब गोस्वामी चॅट लीक प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक होणार ही माहिती एका पत्रकारापर्यंत (अर्णब गोस्वामी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारेच पोहचली, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

26 फेब्रुवारी 2019 रोजी ‘एअर स्ट्राइक’ झाले. मात्र, याबाबत रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी तीन दिवसांपूर्वी म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी मोठी कारवाई होणार असल्याचे माहिती होते. ही माहिती त्यांच्यापर्यंत कोणी पुरवली. त्यांनाच याची माहिती कशी मिळाली, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. ही माहिती संबधित पत्रकाराला कोणी दिली, असा सवाल राहुल गांधींनी केला.

कुणी जीव धोक्यात घातला -

बालाकोटमध्ये एअर स्ट्राईकची माहिती फक्त पाच जणांना होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृह मंत्री, सैन्य प्रमुख यांना होती. तेव्हा ही माहिती संबधित पत्रकाराला कोणी दिली. याबाबत केंद्र सरकारकडून काहीच खुलासा करण्यात आलेला नाही. म्हणेजच या पाच जणांपैकी एका व्यक्तीने ही गुप्त माहिती अर्णब गोस्वामी यांना दिली. या पाच व्यक्तींमधील एका व्यक्तीने आपल्या वैमानिकांचा जीव धोक्यात घालत ही माहिती पत्रकाराला दिली, असे ते म्हणाले.

मोदींनीच पुरवली माहिती -

जर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली नाही. तर मग चॅट लीक प्रकरणावरील चौकशीसाठी एखादी समिती का स्थापन करण्यात आली नाही. विचार केल्यास लक्षात येईल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारेच गुप्त माहिती पत्रकारापर्यंत पोहचली, असा दावा गांधी यांनी केला. जर तस नसेल, तर मोदी यांनी याप्रकरणी एखादी समिती स्थापन करावी आणि पत्रकाराला गुप्त माहिती कोणी पुरवली, त्या व्यक्तीचे नाव उघड करावे, असे राहुल गांधी म्हणाले.

अर्णब गोस्वामी कथित व्हॉट्सअ‍ॅप संभाषण प्रकरण -

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.