नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत आहेत. यावेळी मोदींनी काँग्रेसवर टीका केली. जर काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर कलम ३७०, तिहेरी तलाक, करतारपूर कॉरिडॉर, अयोध्या वाद, भारत बांगलादेश सीमा वाद, असे विषय मार्गी लागले नसते, असे मोदी म्हणाले.
मोदींनी भाषणाला सुरुवात करताच लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यावेळी मोदी म्हणाले, नव्या विचारांनी देशाची सेवा करण्याची संधी लोकांनी आम्हाला दिली. जुन्या पद्धतीनेच आम्ही काम केले असते तर ७० वर्षानंतरही ३७० कलम हटवता आले नसते. तीन तलाकची तलवार आजही मुस्लीम महिलांवर टांगती राहिली असती. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा झाला नसता. राम जन्मभूमी आजही वादात राहिली असती. करतारपूर साहीब कॉरिडोर कधीच झाला नसता, त्याचप्रमाणे भारत बांगलादेश विवादही कधीच सोडवला गेला नसता.
काय म्हणाले मोदी
- संकटाचा सामना करण्यासाठी देश प्रत्येक वेळी तयार आहे
- जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
- आम्ही हिंमत दाखवली नसती सर्वांना बरोबर घेऊन गेलो नसतो तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले असते..
- बेनामी संपत्ती कायदा लागू झाला नसता, २० वर्षानंतर ही चीफ ऑफ डिफेन्सची नियुक्ती झाली नसती
- हे सरकार वेगाने काम करत आहे. आम्ही नव्या जोमाने पुढे जात आहोत..
- स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष देश फक्त वाट पाहत राहणार नाही, त्यामुळे वेग वाढवण्यावर भर दिला..
- वेगाने काम केले म्हणून देशातल्या जनतेने आम्हाला अजून जास्त ताकद दिली..
- कमी वेळात ३७ करोड लोकांचे बँक अकाऊंट, १२ करोड शौचालय, १३ करोड लोकांच्या घरी गॅस
- २ करोड नवीन घर गरीबांसाठी बनले नसते
- दिल्लीच्या १७०० पेक्षा जास्त अवैध कॉलनी, ४० लाख लोकांची बेघर झाले असते त्यांना त्यांचा घराचा हक्क दिला
- नॉर्थ इस्टला किती तरी दशकं फक्त वाट पहावी लागलीय..
- नॉर्थ इस्ट नेहमीच उपेक्षित राहिला आहे. आम्ही वोट बँक म्हणून तिकडे पाहात नाही..
- ४५ हजार कोटी शेकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले..
- मुद्रा योजना, स्टार्टअप इंडियाने रोजगाराला चालना दिली. मुद्रा योजनेतून ७० टक्के महिलांना कर्ज मिळाले, त्यामुळे त्या आर्थिक क्षेत्रात योगदान देत आहेत. २२ कोटींपेक्षा जास्त कर्ज तरुणांना मंजूर
- काँग्रेस मला लाठ्यांनी मारणार आहे, असे मला समजले आहे, मात्र, मी स्वत:ला मजबूत बनवले आहे.
- ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, इझ ऑफ डुईंग बिझनेस,
- देशाच्या अर्थव्यवस्थेला ताकद देण्यासाठी इफ्रास्ट्रक्चर महत्त्वाचे, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यावर भर, इन्फ्रास्ट्रक्चर सर्वांना जोण्याचे आणि विकासाचे काम करतो.
- संविधान वाचवण्याचा काँग्रेसने मंत्र म्हणायला पाहिजे.
- भाजपच्या काळात संविधान वाचवायला पाहिजे, या विरोधकांच्या टीकेला मोदींनी लोकसभेत उत्तर दिले. आणीबाणीच्या काळात संविधान काँग्रेसच्या काळात संविधान वाचवण्याचा विचार आला नाही. काँग्रेसने लोकांनी निवडून दिलेली अनेक सरकारे बरखास्त केली. काँग्रेसच्या काळातील राष्ट्रीय सल्लागार समिती रिमोट कंट्रोल सारखी काम करत होती, त्यामुळे काँग्रेसलाच संविधान समजून घेऊन वाचवायची गरज आहे.
- 'पब्लिक सब जानती है' मोदींचे विरोधकांना उत्तर
- जर तुम्ही संविधानाला मानता तर जम्मू काश्मीरमध्ये भारताचे संविधान का लागू केले नाही.
- १९ जानेवारी १९९० ला काही लोकांनी काश्मीरची ओळख पुसून टाकली. काश्मीरची ओळख सूफी पंरपरा आहे.
- कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये आग लागेल, असे काही लोक म्हणतात.
- मेहबूबा मुफ्ती म्हणतात, १९४७ साली भारतात सामील होऊन काश्मीरने चूक केली. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होईल, असे फारुख अब्दुल्ला म्हणतात. तुम्ही अशा विचारांचे समर्थन करताल का? असी प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला.
- भारताच्या मुस्लिमांना भडकावण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करून दमला.