ETV Bharat / bharat

'चांद्रयान-२'च्या लँडिंगसाठी मोदी उत्सुक; क्षणाक्षणाला घेत आहेत माहिती - Modi can't hide the excitement of chandrayaan-2 landing

चांद्रयान-२ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम आहे. चांद्रयान-२ च्या लँडिंगनंतर रोव्हरचा बाहेरचा कॅमेरा सुरू होईल. त्यानंतर तेथील छायाचित्रे मिळू शकतील. लँडिंगनंतर ५.८ तासांनी प्रत्यक्षात परीक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे. चांद्रयान-२ ची लॅडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील सुमारे ६०-७० विद्यार्थी बंगळुरुमधील इस्रो सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत.

chandrayaan-2 landing
author img

By

Published : Sep 6, 2019, 5:17 PM IST

Updated : Sep 6, 2019, 7:38 PM IST

बंगळुरू - महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-२' आज मध्यरात्रीनंतर दीड ते अडीचच्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. 'चांद्रयान-२' ने आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यामुळे आता लँडिंगदेखील नक्कीच सॉफ्ट होईल यात शंका नाही.

देशासह जगभरातील वैज्ञानिक आणि भारतातील सर्व लोक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि या सर्वांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील, चांद्रयान-२ च्या लँडिंगसाठी उत्सुक आहेत. चांद्रयान-२ च्या वाटचालीची, तिथल्या घडामोडींची ते क्षणाक्षणाला माहिती घेत आहेत.

मोदींनी ट्विटरवर व्यक्त केली उत्सुकता...
१३० कोटी भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण जवळ आला आहे. काही तासांमध्येच चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. मी बंगळुरूमधील इस्रोच्या कार्यालयात उपस्थित राहून या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. यावेळी, वेगवेगळ्या राज्यांमधील तसेच, भूतानमधील तरुण विद्यार्थीही माझ्यासह उपस्थित असतील.

  • The moment 130 crore Indians were enthusiastically waiting for is here!

    In a few hours from now, the final descent of Chandrayaan - 2 will take place on the Lunar South Pole.

    India, and the rest of the world will yet again see the exemplary prowess of our space scientists.

    — Narendra Modi (@narendramodi) September 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • I am extremely excited to be at the ISRO Centre in Bengaluru to witness the extraordinary moment in the history of India’s space programme. Youngsters from different states will also be present to watch those special moments! There would also be youngsters from Bhutan.

२२ जुलै रोजी चांद्रयान-२ चे प्रक्षेपण झाले. तेव्हापासून वेळोवेळी मी चांद्रयान-२ च्या प्रगतीबद्दल माहिती घेत आलो आहे. माझ्यासह तुम्हीही या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. चांद्रयान-२ चे लँडिंग पाहतानाचे आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करा, त्यांपैकी काही मी रिट्विट करेल, असे आवाहन मोदींनी ट्विटरवरुन केले आहे.

  • I have been regularly and enthusiastically tracking all updates relating to Chandrayaan - 2 since it was launched on 22nd July 2019. This Mission manifests the best of Indian talent and spirit of tenacity. Its success will benefit crores of Indians.

  • I urge you all to watch the special moments of Chandrayaan - 2 descending on to the Lunar South Pole! Do share your photos on social media. I will re-tweet some of them too.

हेही वाचा : बारामतीची सिध्दी पवार घेणार पंतप्रधानांसोबत चांद्रयान मोहीम पाहण्याचा अनुभव

Intro:Body:

Nationl

Conclusion:
Last Updated : Sep 6, 2019, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.