श्रीनगर- पुलवामा जिल्ह्यात हिज्जबूल मुजाहिद्दीनचा मुख्य कमांडर रियाझ नायकू आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू आहे. यावेळी नायकूसोबत अजून एक दहशतवादी असल्याचे समजले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आज काश्मीरमधील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर जिल्ह्यातील बेगपोरा परिसरात शोध मोहीम सुरू केली होती. त्यादरम्यान, अचानक दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली आहे.
हेही वाचा- भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांनी 1.9 कोटी रुपये जप्त केले