ETV Bharat / bharat

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या अल्पवयीन बहिणीचा 'तिने' मित्राच्या मदतीने काढला काटा.. रेल्वे रुळावर आढळला मृतदेह - मिर्झापूरमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या

प्रेमात अडथळा निर्माण केल्यामुळे मोठ्या बहिणीने छोट्या अल्पवयीन बहिणीचा मित्राच्या मदतीने काटा काढल्याची घटना यूपीमध्ये घडली आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला.

mirzapur-minor-girl-kills
http://10.10.50.80:6060//finalout3/odisha-nle/thumbnail/03-October-2020/9035076_764_9035076_1601722260336.png
author img

By

Published : Oct 3, 2020, 5:27 PM IST

Updated : Oct 3, 2020, 5:50 PM IST

मिर्झापूर - उत्तरप्रदेशमधील हाथरस घटनेने देशभर वातावरण ढवळून निघाले असताना आणखी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मिर्झापूर जिल्ह्यातील बहुरुवा गावात रेल्वे रुळावर एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. दोन दिवसापूर्वी दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यातील एका मुलीचा मृतदेह आढळला आहे.

पोलिसांनी सांगितले, की एक ऑक्टोबरपासून दिलीप सिंह यांच्या अंजली (वय १५) व नंदिनी (वय १०) या दोन मुली घरातून बेपत्ता होत्या. मुली बेपत्ता असल्याची तक्रार पादरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतला असता मोठी मुलगी तिच्या मित्राबरोबर मोटारसायकलीवरून पळून जाताना पोलिसांनी सापडली, तर छोट्या मुलीचा मृतदेह रेल्वे रुळाशेजारी आढळला.

पोलिसांनी सांगितले, की छोटी बहीण प्रेमाच्या आड येत असल्याने अंजलीने मित्राच्या मदतीने तिच्या हत्येचा कट रचला.

रेल्वे रुळाशेजारी नंदिनीचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस दलाकडून या घटनेचा जलद तपास केल्याबद्दल पथकाला २५ हजाराचे रोख बक्षीस देण्यात आले.

Last Updated : Oct 3, 2020, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.