बलरामपूर - छत्तीसगडमध्ये महिलांवरील आत्याचाराच्या गुन्ह्यांत झपाट्याने वाढ होत आहे. बलरामपूर जिल्ह्यातील बसंतपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या विभागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बलरामपूरच्या बसंतपूर भागात अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. छत्तीसगडच्या बलरामपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत कातलम यांनी ही माहिती दिली.
बलरामपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत कातलम यांनी सांगितले की, “16 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेनंतर मुलीने विष घेतले. तिला दोन दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोपींना अटक करण्यासाठी एक पथक पाठवण्यात आले आहे." अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनी आम्हाला घटनेची माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे."