चंदीगढ - हरियाणामध्ये एका 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घराबाहेर मुलगी खेळत असताना एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना राज्यातील धारुहीरा येथे घडली.
हेही वाचा - पंढरपुरात दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
या प्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. स्थानिक पोलिसांनी आरोपी पकडण्यास पोलिसांना मदत केली. पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना अल्पवयीन मुलाने फसवून तिला अज्ञातस्थळी नेत अत्याचार केला.
हेही वाचा - महिलेवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा; बिलोली न्यायलयाचा निकाल
सुरक्षारक्षकाला मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने त्याने मुलीला वाचवले. मात्र, तोपर्यंत आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अल्पवयीन मुलाला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.