ETV Bharat / bharat

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ बैठकीसाठी दिल्लीत दाखल - दिल्ली 2+2 बेठक

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर बेठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ हे त्यांच्या पत्नी सुजान पॉम्पिओ यांच्यासोबत दिल्लीत आले आहेत.

Mike Pompeo reaches India
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ 2+2 बेठकीसाठी दिल्लीत दाखल
author img

By

Published : Oct 26, 2020, 6:25 PM IST

नवी दिल्ली - चीनसमवेत सीमेवर तणावपूर्वक परिस्थिती आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि भारत यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर बेठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ हे त्यांच्या पत्नी सुजान पॉम्पिओ यांच्यासोबत दिल्लीत आले आहेत. पोम्पिओ यांचा एका महिन्यातील दुसरा भारत दौरा असून ते मालदीव, श्रीलंका आणि इंडोनेशियाचा देखील दौरा करणार आहेत, असे पोम्पिओ यांनी ट्वीट करुन सांगितले आहे.

माइक पॉम्पिओ
माइक पॉम्पिओ

पंतप्रधानांची भेट

भारत आणि अमेरिका यांच्यातील बैठक मंगळवारी होणार आहे, मात्र त्याआधी सोमवारी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. ही बैठक हैदराबाद हाऊसमध्ये होणार आहे. तर मंगळवारी दोन्ही नेते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. त्यानंतर भारत आणि अमेरिकेकडून संयुक्त निवेदनही जारी केले जाईल. चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला उघडपणे पाठिंबा दिला असून चीनवर वातावरण बिघडवण्याचा आरोप केला आहे.

बैठकीत होणारी चर्चा

भारत आणि चीन विषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत बेसिक एक्सचेंज आणि कॉर्पोरेशन करारावर मोहोर लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर अमेरिका भारत यांच्यात आंतरराष्ट्रीय आणि सामरिक महोत्सवाविषयी बातचीत होईल. तसेच मिसाईल टारगेटींगसाठी भारताला अॅडव्हान्स सॅटलाईट आणि टोपोग्राफिकल डेटा उपलब्ध करण्याविषयी करार देखील होणार आहे. हा करार झाल्यास अमेरिका भारताला लॉंग रेंज नेव्हिगेशन आणि मिसाइल टारगेटिंग यासाठी अॅडव्हान्स सॅटेलाइट अँड टोपोग्राफिकल डेटा देणार आहे. यामुळे भारताच्या सामरिक सामर्थ्यात वाढ होणार आहे. जपानमध्ये झालेल्या क्वाडचा सदस्य असेलेल्या भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची एक बैठक झाली होती. भारताचे परराष्ट्रमंत्री देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीतील अनेक निर्णय यावेळी चर्चिले जाण्याची शक्यता आहे.

तिसरी बैठक

भारत आणि अमेरिका यांच्यात आतापर्यंत संरक्षण व्यापार मजबूत राहिला आहे. यातून भारत-अमेरिका सरंक्षण तंत्रज्ञान आणि व्यापारात सहउत्पादन आणि विकासावर काम करत आहेत. पहिली बैठक ही सप्टेंबर 2018मध्ये दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पार पडली होती. तर दुसरी बैठक गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वॉशिंग्टन येथे पार पडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.