श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजातील एका सरपंचाची हत्या झाली होती. या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आज स्थलांतरित काश्मिरी पंडितांच्या संघटनेने केली आहे.
40 वर्षीय अजय पंडित या सरपंचाची सोमवारी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अजय पंडित हे आपल्या मातृभूमीवरील अतुलनीय प्रेमामुळे आणि ज्या खेड्यात ते राहत होते, त्या गावाबद्दलच्या चिंतेमुळे घटीत राहत होते, असे स्थलांतरित पंडितांचा सलोखा, परतावा व पुनर्वसनचे अध्यक्ष सतीश महालदार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. हत्येची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सतीश महालदार पुढे म्हणाले की, अल्पसंख्यक समुदायाचा प्रतिनिधी म्हणून पंडिताच्या लढ्याने अल्पसंख्याक समाजाला आशा दिली होती. त्यामुळे त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. तसेच, काश्मिरी बांधवांना आणि खासकरून जे गरीब लोकांसाठी काम करतात त्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या करून मारेकरी त्यांच्या मातृभूमीशी बेईमानी करत असल्याचेही सतीश महालदार म्हणाले.
त्याचबरोबर, सतीश महालदार यांनी गोळीबार थांबवण्याची विनंती केली असून, कुणाला तक्रारी असल्यास त्या सांगाव्या. त्यावर आपण सोबत लढू व शांती आणि बंधुत्वाचे उद्धिष्ट सध्य करू, अशी विनंती केली. दरम्यान, काश्मीरमध्ये राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांकडून सरपंचाच्या हत्येचा व्यापक निषेध केला जात आहे.