ETV Bharat / bharat

कोरोना चाचणी अधिक प्रभावी करण्यासााठी मायक्रोसॉफ्ट आणि अ‌ॅडाप्टिव्ह कंपनीचे संशोधन सुरू - Novel Coronavirus

कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी शरिरातील पेशी कशा काम करतात. हे मुख्यता या अभ्यासातून समजून घेण्यात येणार आहे. कोरोना चाचणी आणि उपचार जलद करण्यासाठी हा अभ्यास फायदेशीर ठरणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 7, 2020, 2:29 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - कोरोना चाचणी अधिक विश्वासाहार्य बनविण्यासाठी आता मायक्रोसॉफ्टने संशोधन सुरू केले आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि 'अॅडाप्टिव्ह बायोटेक्नॉलॉजिकल' यांनी मिळून कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रतिकारक्षमता कशी काम करते यासबंधीचा एक इम्यूनरेस (ImmuneRACE) नावाचा 'व्हर्च्यूअल स्टडी' सुरू केला आहे. कंपनीने अधिकृत पत्रक जारी करत याची माहिती दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी शरिरातील पेशी कशा काम करतात. हे मुख्यता या अभ्यासातून समजून घेण्यात येणार आहे. कोरोना चाचणी आणि उपचार जलद करण्यासाठी हा अभ्यास फायदेशीर ठरणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या अभ्यासामध्ये १ हजार कोरोनाग्रस्त सहभागी होणार आहेत. रक्तातील रोगप्रतिबंधीत पेशी, टी सेल यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. शरिरातील टी सेल सर्वात आधी आजार ओळखून त्याविरोधात लढाई सुरू करते, अशी माहिती कंपनीने दिली.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांचा अभ्यास करून विषाणूबद्दल महत्वाची माहिती मिळवता येऊ शकते. त्यामुळे प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी मदत होऊ शकते, असे मायक्रोसॉफ्टचे अधिकारी पीटर ली यांनी सांगितले.

या अभ्यासातून येणारे निष्कर्ष आणि माहिती सार्वजनिक करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांना हा अभ्यास वापरता येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. सद्य स्थितीत कोरोनाचे निदान करण्यासाठी दोन चाचण्या उपलब्ध आहेत. तिसऱ्या पद्धतीनेही कोरोनाची चाचणी करता येऊ शकते, असे अॅडाप्टिव्ह आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.