मुंबई - केंद्र सरकारने अनलॉक-2 जाहीर केला आहे. या अनलॉक-2 साठीच्या मार्गदर्शक सूचनाही सोमवारी रात्री जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना 31 जुलैपर्यंत लागू असतील.
केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, 31 जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद राहतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो सर्व्हिस, सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, थिएटर्स, बार, तसेच सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरही 31 जुलैपर्यंत निर्बंध असणार आहे. तसेच अपवादात्मक स्थिती वगळता रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहील.
-
#UNLOCK2: Lockdown shall continue to remain in force in containment zones till July 31st. In containment zones, only essential activities to be allowed. pic.twitter.com/krHxvKP9a7
— ANI (@ANI) June 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UNLOCK2: Lockdown shall continue to remain in force in containment zones till July 31st. In containment zones, only essential activities to be allowed. pic.twitter.com/krHxvKP9a7
— ANI (@ANI) June 29, 2020#UNLOCK2: Lockdown shall continue to remain in force in containment zones till July 31st. In containment zones, only essential activities to be allowed. pic.twitter.com/krHxvKP9a7
— ANI (@ANI) June 29, 2020
तसेच गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करण्याची परवानगी असेल. याशिवाय स्थानिक प्रशासनाला कलम 144 लागू करण्यासारखे आदेश जारी करता येतील.
कंटेन्मेंट झोन वगळता काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार -
शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 31 जुलैपर्यंत बंद राहतील.
मेट्रो सेवा, सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, जीम, एंटर्टेन्मेंट पार्क, थिएटर्स, बार, ऑडिटोरिअम आणि असेम्बली हॉल, अशी ठिकाणे बंदच राहतील.
सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन, शैक्षणिक कार्यक्रमांवर बंदी कायम आहे.
देशांतर्गत उड्डाणे आणि रेल्वे प्रवास काही अटी आणि शर्तींनुसार यापूर्वीच सुरू करण्यात आला आहे. हे पुढेही सुरू राहतील.
31 जुलैपर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल. पण, यात आवश्यक सेवा, कंपन्यांतील शिफ्टमध्ये काम करणारे लोक, नॅशनल आणि स्टेट हायवेवर सामानाची ने-आन करणारी वाहने, कार्गोच्या लोडिंग आणि अनलोडिंगवर निर्बंध लागू असणार नाहीत.
हेही वाचा - कोरोनावरील पहिली भारतीय लस तयार; 'कोव्हॅक्सिन'ची मानवी चाचणी होणार जुलैमध्ये..
हेही वाचा - टिक-टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अॅप्सवर देशात बंदी!