नवी दिल्ली - डीएमआरसीच्या (दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशन) एका कर्मचाऱ्याने रविवारी फेसबुक लाईव्ह करत गळफास घेऊन आत्महत्या केली. लाईव्ह सुरू असताना अनेकांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने ऐकले नाही. प्लास्टिकच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आहे. शुभांकर चक्रवर्ती असे मृताचे नाव आहे. पोलिसांची तो व्हिडिओ जप्त केला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी फर्श बाजार पोलिलांच्या माहिती मिळाली की, छोटा बाजार मेट्रो स्थानकाजवळीन घरात एका मेट्रो कर्मचाऱ्याने फेसबुक लाईव्ह करत गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी शाहदराच्या तेलीवाडा भागात पोहोचली.
दरवाजा तोडून काढले मृतदेह
पोलिसांना फोन सूर्यकांत नामक व्यक्तीने फोन करून मित्र शुभांकर चक्रवर्तीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. तो पश्चिम बंगालच्या २४ परगनाचा रहिवासी होता. तो तेलीवाडा भागात गेल्या दोन महिन्यांपासून रहात होता. शुभांकरने घराचा दरवाजा आतून बंद करून आत्महत्या केली होती. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांना तो प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळी खिडकीत त्याच्या मोबाईलवर फेसबुक लाईव्ह सुरू होते.
सकाळी ८ वाजता केले फेसबुक लाईव्ह
सकाळी ८ वाजता सूर्यकांतला त्याचा मित्र आकाशने सांगितले की, शुभांकर फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करत आहे. याची माहिती सूर्यकांत ने राजेंद्र ओझाला दिली. राजेंद्र ओझा ज्यावेळी शुभांकरच्या घरी पोहोचले त्यावेळी त्याच्या घरचा दरवाजा आतून बंद होता. ओझाने खिडकीतून डोकावून पाहिल्यास त्याला शुभांकर फासावर लटकलेला दिसला.
२ महिन्यापासून घेत होता डीएमआरसीत प्रशिक्षण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांकर हो डीएमआरसी काम करत होता. मागील दोन महिन्यापासून त्याचे प्रशिक्षण सुरू होते. तो परिवारचा एकुलता एक मुलगा होता.