ETV Bharat / bharat

व्हिडिओ : आकाशातून पडला 'अनोखा' गोळा; पाणी ओतल्यावर लागतेय आग

पठाणकोट भागात ढगातून एक गोळा खाली पडला. यानंतर सर्व भागात धुराचे लोट उठले आणि जमिनीतून लाव्हारस बाहेर निघाला आहे.

हवेतून पडला अनोळखी गोळा
author img

By

Published : Jun 15, 2019, 1:21 PM IST

चंदीगड - पंजाब राज्यातील पठाणकोट येथे आगळीवेगळी घटना घडली. यामुळे येथील लोक हैराण झाले आहेत. घटना अशी, की डिफेंस रोड जवळील भागात ढगातून एक गोळा खाली पडला. यानंतर सर्व भागात धुराचे लोट उठले आणि जमिनीतून लावारस बाहेर निघाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

पठाणकोट येथे ढगातून पडली अनोळखी वस्तू

रानीपूर गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ढगातून एक लाल गोळा खाली पडताना गावकऱ्यांनी पाहिले. यानंतर, प्रशासनाला याबाबत कळवण्यात आले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून याची पाहणी केली. या गोळ्यातून अजूनही धुराचे लोट उठत आहेत. याठिकाणी लाकूड फेकले तर त्याला आग लागत आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे पाणी फेकल्यावर यातून मोठा धूर निघत आहे.

तपास करणाऱया अधिकाऱयांनी याबाबत सांगितले, की हा गोळा उल्कापिंड असू शकतो. परंतु, तपास होईपर्यंत याबाबत काहीही सांगितले जाऊ शकत नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.