श्रीनगर - येथील कडाक्याच्या थंडीमुळे केंद्रशासित प्रदेश लडाखची राजधानी लेह येथे रात्री तापमानाचा पारा 12.9 अंश सेल्सियसपर्यंत खाली पोहोचला. तर, जम्मू-काश्मीरमध्येही तापमानामध्ये मोठी घट नोंदवली गेली.
येथील हवामान खात्याने येत्या गुरुवारपर्यंत कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविला आहे.
श्रीनगरमध्ये पारा उणे 2.2 या किमान स्थितीवर, पहलगाममध्ये उणे 5.2, गुलमर्गमध्ये उणे 5.6 आणि कारगिलमध्ये उणे 9.2 अंश सेल्सिअस नोंदविला गेला.
हेही वाचा - हिवाळ्यातही चीनचा सामना करण्यास भारत सज्ज.. पँगाँग तलाव परिसरामध्ये मार्कोस तैनात
'रात्री स्वच्छ असलेल्या आकाशामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील तापमानात मोठी घट झाल्याची आज नोंद झाली आहे. दोन्ही केंद्रशासित प्रदेशांत पुढील पाच दिवस हवामान सामान्य आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे,' असे हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
जम्मू, कटरा, बटोट, बनिहाल आणि भादरवाह येथे किमान तापमान अनुक्रमे 8.6, 9.4, 6.9, 5.2 आणि 0.8 अंश सेल्सिअस होते.
हेही वाचा - मनाली, रोहतांगचे सुंदर दृश्य; कोरोना-लॉकडाऊनमुळे प्रदूषणाची पातळी घटली