शिलाँग - मेघालयात ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढवण्याचा आमचा विचार आहे, असे मेघालयाचे मुख्यमंत्री कोनरड संगमा यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. पंतप्रधानांनी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाविषयी राज्यनिहाय आढावा घेतला.
देशातील लॉकडाऊन संपल्यानंतर ग्रीन झोनमध्ये काही गोष्टी सुरू करण्यात येतील तसेच कोरोनाचा प्रभाव नसलेल्या जिल्ह्यातही काही हालचाली सुरू होतील. मात्र, ३ मेनंतरही लॉकडाऊन कायम ठेवण्याचा आमचा विचार आहे, असे संगमा यांनी टि्वट करत म्हटले आहे.
मेघालयात कोरोनाचे एकूण १२ रुग्ण आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ११ अॅक्टिव्ह केसेस आहेत. दोन जिल्ह्यांना रेड झोन म्हणून घोषित केले आहे.