लखनौ - आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे बसप प्रमुख मायावतींनी स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेत मायावतींनी आपला निर्णय जाहीर केला. आगामी परिस्थितीत निवडणूक न लढणे पक्षहिताचे असल्याचेही मायावतींनी म्हटले आहे.
सपा आणि बसपाच्या युतीनंतर मायावती लोकसभा निवडणूक लढवणार का, या चर्चा जोरात सुरू होत्या. मात्र, मायावतींच्या स्पष्टीकरणानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. माझ्या विजयापेक्षा महायुतीचा विजय महत्त्वाचा आहे. पक्षप्रमुख म्हणून मोठे निर्णय घ्यावे लागतात. पुढे गरज पडल्यास संसदेत जाईल, असेही त्या म्हणाल्या.