ETV Bharat / bharat

भारत सरकारने माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यावा; हुतात्मा राजेश ओरंगच्या बहिणीची भावना - भारत चीन युद्ध न्यूज

राजेश ओरंग बीरभूमच्या मोहम्मदबाजारच्या भुतुरा ग्रामपंचायतीच्या बेलगेरिया गावामधील रहिवासी होता. राजेश भारतीय सैन्याच्या बिहार रेजिमेंटमध्ये 2015 साली भर्ती झाला होता. कुटुंबातील एकुलता एक कमावता राजेश हुतात्मा झाल्यामुळे त्याच्या कुटुंबापुढे संकट निर्माण झाले आहे.

Rajesh Orang
हुतात्मा राजेश ओरंग
author img

By

Published : Jun 17, 2020, 2:15 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील राजेश ओरंग हा जवान चिनी सैन्यासह झालेल्या झटापटीत हुतात्मा झाला आहे. लडाखमधील गलवान प्रांतात झालेल्या झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. राजेश ओरंग (वय 26) हा भारतीय सैन्याच्या बिहार रेजिमेंटचा जवान होता.

राजेश ओरंग बीरभूमच्या मोहम्मदबाजारच्या भुतुरा ग्रामपंचायतीच्या बेलगेरिया गावामधील रहिवासी होता. त्याचे वडील सुभाष ओरंग हे आदिवासी शेतकरी असून त्याला दोन बहिणी आहेत. भारत सरकारने माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यावा, अशी माझी इच्छा आहे, असे राजेशची बहीण म्हणाली. काल आम्हाला लष्कराच्या अधिकाऱ्यांचा फोन आला आणि माझा भाऊ चिनी सैन्यासह हिंसक झटापटीत मारला गेला, अशी माहिती आम्हाला दिली गेली. भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला त्यामुळे आम्ही अधिक माहिती विचारू शकलो नाही, असे राजेश ओरंग यांच्या बहिणीने सांगितले.

राजेश २०१५मध्ये उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्यात दाखल झाला होता. तो बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत होता. राजेश हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक कमावती व्यक्ती होती. "माझ्या मुलाने देशाची सेवा केली आणि त्यासाठी त्याने आपला जीव दिला," अशी भावना राजेश ओरंगच्या वडिलांनी व्यक्त केली. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्याच्या धक्क्यातून राजेशच्या आई ममता सावरलेल्या नव्हत्या. त्या निःशब्द होत्या. राजेश पुढच्या सुट्टीवर परत आला की, त्याचे लग्न करायचे, असे त्यांनी ठरवले होते.

लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री तसेच मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.