ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमुळे पोलीस स्टेशनमध्येच पार पडला विवाह समारंभ

विवाहाची पूर्वनियोजित तारीख बदलल्याने आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

marriage-in-jamul-police-station-of-durg
लॉकडाऊनमुळे पोलीस स्टेशनमध्येच पार पडला विवाह समारंभ
author img

By

Published : Apr 28, 2020, 1:32 PM IST

दुर्ग - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक कार्यक्रम लांबणीवर पडले आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्येच विवाह आटोपून घेणारेही बरेच आहेत. दुर्ग जिल्ह्यातील जामुल गावात चक्क पोलीस स्टेशनमध्येच विवाह समारंभ पार पडला आहे. विवाहाची पूर्वनियोजित तारीख बदलल्याने आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांना सोशल डिस्टंसचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे बरेच कार्यक्रम आणि विवाहसमारंभाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दुर्गच्या जामुल गावातील फौजी नगर येथे राहत असलेला दिनेश पाठक याचे लग्न सेक्टर ६ मधील राहणारी युवती पूनम हिच्याशी ठरले होते. २६ एप्रिलला त्यांच्या लग्नाची तारीख ठरली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना या विवाहाची परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे दोघांनीही पोलीस ठाणे गाठले. तसेच, पोलिसांची परवानगी घेऊन विवाह आटोपला.

त्यांच्या या विवाहप्रसंगी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय यादव आणि जामुल पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचारी वरातीत सहभागी झाले होते. तसेच अजय यादव यांनी नवदाम्पत्याला ५१०० रुपयांची भेट देऊन शुभाशीर्वाद दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.