चेन्नई - रामोजी उद्योग समुहाअंतर्गत कार्यरत असलेल्या 'मार्गदर्शी चीटफंड'ने यावर्षीच्या 'एक्सलन्स बिझनेस अवॉर्ड'वर आपली मोहोर उमटवली. उत्तम उलाढाल झाल्याच्या कामगिरीबद्दल ऑल इंडिया असोशिएसन ऑफ चिटफंड संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला आहे. तब्बल ११ हजार पाचशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याच्या यशस्वी कामगिरीला हा गौरव प्राप्त झाला. चेन्नई येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमामध्ये फंडच्या संचालिका शैलजा किरण यांनी हा पुरस्कार स्विकारला.
रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि लेखापरिक्षक गुरूमूर्ती यांनी हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी संचालिका शैलजा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा क्षण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. या पुरस्कारामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल. बँक आणि एनबीएफसी यांना ज्याप्रमाणे जीएसटीमधून सूट मिळते. त्याचप्रमाणे चिट फंडांनासुद्धा करातून सूट मिळावी अशी त्यांनी मागणी केली.