ETV Bharat / bharat

ओडिशात माओवाद्यांना दगडाने ठेचले, एक ठार; प्रजासत्ताक दिन साजरा करू नये म्हणून केला होता गोळीबार - ओडिशा माओवादी ठार

शनिवारी रात्री या गावामध्ये दोन माओवादी आले होते. त्यांनी गावकऱ्यांना २६ जानेवारी हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा न करता, 'काळा दिवस' म्हणून साजरा करण्यास सांगितले. याला विरोध करत गावकऱ्यांनी त्यांना गावाबाहेर हाकलण्यास सुरूवात केली. त्यावेळी, गावकऱ्यांना भीती घालण्यासाठी त्या माओवाद्यांनी हवेत गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून गावकऱ्यांनी धनुष्यबाण, काठ्या आणि दगडांनी त्यांना मारण्यास सुरूवात केली.

Maoist stoned to death in Odisha's Malkangiri
ओडिशामध्ये मॉब लिंचिंग; गावकऱ्यांनी माओवाद्यांना दगडाने ठेचले, एक ठार!
author img

By

Published : Jan 26, 2020, 5:43 PM IST

भुवनेश्वर - ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात गावकऱ्यांनी दोन माओवाद्यांना दगडांनी ठेचल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक माओवादी जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. जिल्ह्यातील जांतुराई गावामध्ये काल (शनिवार) रात्री ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री या गावामध्ये दोन माओवादी आले होते. त्यांनी गावकऱ्यांना २६ जानेवारी हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा न करता, 'काळा दिवस' म्हणून साजरा करण्यास सांगितले. याला विरोध करत गावकऱ्यांनी त्यांना गावाबाहेर हाकलण्यास सुरूवात केली. त्यावेळी, गावकऱ्यांना भीती घालण्यासाठी त्या माओवाद्यांनी हवेत गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून गावकऱ्यांनी धनुष्यबाण, काठ्या आणि दगडांनी त्यांना मारण्यास सुरूवात केली. यामध्ये एका माओवाद्याचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या दोघांचीही ओळख अजून पटली नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

माओवाद्यांमुळे गावचा विकास होत नसल्याची तक्रार गावकरी पूर्वीपासूनच करत होते. नुकतेच माओवाद्यांनी गावात नवीन रस्ता बांधण्यास मज्जाव केल्यामुळे, हे गाव इतर गावांपासून तोडले गेले आहे. या गावाच्या तीन बाजूला बालीमेरा जलाशय असल्यामुळे, केवळ एकाच बाजूने हे इतर गावांशी जोडले जाऊ शकते. मात्र माओवाद्यांमुळे तेही शक्य होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

गावकऱ्यांनी मिळून माओवाद्यांना मारल्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी माओवाद्याचा मृतदेह आणि दुसऱ्या माओवाद्याला बीएसएफ जवानांच्या ताब्यात दिले. मलकानगिरी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी जखमी माओवाद्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले. तसेच, या घटनेचा सूड घेण्यासाठी माओवादी कदाचित या गावावर हल्ला करू शकतात अशी भीती असल्यामुळे बीएसएफ जवानांचे एक पथक या गावामध्ये तैनात करण्यात आले आहे.

हेही वाचा : कर्नाटकमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; बसवेश्वर स्वामींसह चार ठार..!

Intro:Body:

Maoist Died Due To Stone Pelting By Villagers In Malkangiri, , UPDATED PHOTO

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.