जम्मू काश्मीर- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून शपथ घेतली. ते पहिले राजकीय व्यक्ती ठरले आहेत, ज्यांनी केंद्रशासित प्रदेशाचा राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.
61 वर्षीय मनोज सिन्हा यांचा जनसंपर्क दांडगा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील त्यांच्या संपर्कासाठी ते ओळखले जातात. जम्मू-काश्मीरच्या राज भवनामध्ये न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी त्यांना ही शपथ दिली.
जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी बुधवारी राजीनामा दिला, त्यानंतर राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला आहे. मुर्मू आता भारतांचे नियंत्रक व महालेखा परीक्षक (सीएजी) म्हणून पदभार स्वीकारतील.
शपथविधी वेळी राज्यसभेचे सदस्य नाझीर अहमद लवाय भाजपचे लोकसभा खासदार जीवन किशोर शर्मा आणि जम्मू काश्मीर आपली पार्टी'चे नेते गुलाम हसन मीर हे उपस्थित होते.