नवी दिल्ली - हरियाणाध्ये मणिपूर येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय तरुणीला काही स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना घडली. तिला कोरोना असे म्हणत शिव्या दिल्या. गुरुग्राम येथील फैजापूरमध्ये ही घटना घडली.
चोंग होई मिसाओ असे तरुणीचे नाव आहे. मी मित्राच्या घरी दुपारच्या जेवणासाठी गेली होती. घरी परत येताना मला एका वयस्कर महिलेने थांबवले. उद्धटपणे वागत मला शिवीगाळ केली आणि कोरोना असे म्हटले. महिलेच्या कुटुंबीयातील लोकांनी मला काठीने मारहाण केली, असे पीडित चोंग होई मिसाओ हीने सांगितले.
मला मदत करण्यासाठी एकही स्थानिक पुढे आला नाही. मी मैत्रिण प्रियंकाला कॉल करू शकलो आणि तिने पोलिसांना बोलावले. पोलिसांद्वारे कोणतीही कारवाई केली गेली नाही. शिवाय, पोलिसांनी मला तडजोड करायला सांगितली, असे मिसाओने सांगितले.