लखनऊ - 'तबलिगी जमात'बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ही घटना घडली आहे.
लौटन निशाद असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी एका चहाच्या टपरीवर गप्पा मारताना त्याने तबलिगी जमातच्या सदस्यांबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या रागातून त्या तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली. मोहम्मद सोना असे गोळी झाडणाऱ्याचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत..
राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत दिली आहे. यासोबतच त्यांनी गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
यासोबतच देशात लॉकडाऊन असताना ही चहाची टपरी कशीकाय सुरू होती याबाबत त्यांनी उत्तर मागितले आहे. याबाबत संबंधित विभागाच्या पोलिसावर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.
हेही वाचा : वाराणसीत कोरोनाबाधिताचा मृत्यू, जिल्ह्यात संचारबंदी लागू