सोनभद्रा (उत्तर प्रदेश)- रॉबर्ट्सगंज कोतवाली परिसरातील बिच्छी गावचा रहिवासी घनश्याम बिलास उर्फ पटलू ही व्यक्ती दररोज शेणाने अंघोळ करते. तसेच घनश्याम गोमूत्र देखील पितो. यामुळे सर्व आजारांपासून दूर राहता येते असा त्यांचा समज आहे.
हेही वाचा- ...बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे!
गायीच्या शेणाने अंघोळ करताना घनश्यामला पाहण्यासाठी गावभरातील लोक येतात.घनश्याम यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, आजोबांनी त्यांना शेणाने स्नान करण्यास प्रेरित केले.2016 पासून मी शेणाने आंघोळ करतो. त्यामुळे आरोग्याबाबतील मला माझ्या आत किंवा बाहेरील सर्व अडचणीपासून मुक्तता मिळाली आहे.