कोईंबतूर - सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एकाला पोलिसांनी अटक केली. त्याने हिंदू संघटन 'हिंदू मक्कल काची'चे प्रमुख अर्जुन संपथ यांना "मी तुमच्या शहरात आहे आणि इथे गोमांस खात असून मला अडवून दाखव," असे आव्हान दिले होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला धार्मिक तेढ पसरवत असल्याच्या कारणावरून अटक केली आहे.
आरोपीचे नाव निर्मल कुमार असून तो 'द्रवीदर विदुथलाई कझकम' या संघटनेत काम करतो. त्याने १२ जुलै रोजी संपथ यांना फेसबुकवरून आव्हान दिले होते. "मी तुझ्या शहरात गोमांस खात आहे, तुझ्यात जर दम असेल तर, मला अडवून दाखव," अशा प्रकारे मजकूर लिहून गोमांस खातानाचे फोटो सतत फेसबुकवर टाकत आरोपीने संपथ खुले आव्हान दिले होते.
आरोपीला पोलिसांनी कलम ५०५ अन्वये अटक केली असून, न्यायालयाने ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.