रांची- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा खंडित केल्या आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या हातचे काम गेले आहे. अशातच रांची येथील अरगोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक नगर रोड नंबर चार येथे राहणाऱ्या रिक्षाचालकाने आत्महत्या केली आहे. कोरोना विषाणूमुळे आणि लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक हतबल होता. त्यामुळे त्याने आपला प्राण गमावला, असे सांगितले जात आहे. पप्पू कुमार, असे त्याचे नाव आहे.
हेही वाचा- नेपाळमधील तबलिगी जमातीच्या १४ जणांना संमनेरमध्ये दिला आसरा; 5 जणांवर गुन्हा दाखल
पप्पू ज्या घरात भाड्याने राहत होता, तेथील मालकाने पोलिसांना सांगितले, की पप्पू काही दिवसांपासून तणावाखाली होता. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याच्यावर उपचारदेखील सुरू होते. मात्र, सध्या त्याची प्रकृती ठणठणीत होती. मात्र, त्याने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू आह.