लखनऊ (उत्तर प्रदेश) - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणारा आरोपी 25 वर्षांचा असून, तो अंमली पदार्थ सेवन करत असल्याचे समोर आले आहे. तसेच तो मुंबईतल्या झवेरी बाजार येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. 2017 ला स्पाईनल टीबी शस्त्रक्रिया झाली होती. कामरान अमीन खान असे आरोपीचे नाव असून, त्याचे वडील हे टॅक्सी चालवून उदर्निवाह करत होते.
उत्तर प्रदेशमध्ये आरोपीचे कोणीही नातेवाईक नाहीत -
दोन महिन्यांपूर्वी आरोपीच्या वडिलांचे निधन झाले होते. भाऊ इमरान खान हा मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. त्याची आई ही शिक्षिका होती. आरोपीचे उत्तर प्रदेशमध्ये कोणीही नातेवाईक नसल्याचे माहिती समोर येत आहे.
112 या व्हाटसअॅप क्रमांकवर दिली होती धमकी -
कामरान खान आरोपीने 112 क्रमांकावर संपर्क करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर गोमतीनगरचे ठाणेदार धीरज कुमार यांनी तक्रार दाखली केली. त्यानंतर आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आले.