ETV Bharat / bharat

'जय श्रीराम' ऐकताच भडकल्या ममता; म्हणाल्या, या घोषणा 'शिव्या' आहेत

या व्हिडिओमध्ये काही भाजप कार्यकर्ते 'जय श्रीराम' अशा घोषणा देताना दिसत आहेत. यावर ममता चिडून त्यांच्या गाडीतून उतरल्या. ते पाहताच भाजप कार्यकर्ते तिथून पळू लागले. त्यावर ममता 'आता का पळताय, आता द्या घोषणा' असे म्हणत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.

ममता बॅनर्जी
author img

By

Published : May 5, 2019, 2:52 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ममतांचा ताफा जात असताना 'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर ममता भडकल्या, त्याचा हा व्हिडिओ आहे. या प्रकरणी ३ जणांना अटक झाली आहे. हा भाग पश्चिम मिदनापूरमधला तृणमूलचा गड समजला जातो. भाजप जाणूनबुजून लोकांना चुकीचे वर्तन करायला पाठवतो, असे ममता यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून एका निवडणूक रॅलीसाठी ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांना 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. या घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून उतरून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या. भाजपच्या बंगाल युनिटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात त्यांनी 'दीदी 'जय श्रीराम' घोषणेवर इतक्या नाराज आहेत, की त्या या घोषणा म्हणजे शिव्या असल्याचे म्हणत आहेत,' असा आरोप केला आहे.

या व्हिडिओमध्ये काही भाजप कार्यकर्ते 'जय श्रीराम' अशा घोषणा देताना दिसत आहेत. यावर ममता चिडून त्यांच्या गाडीतून उतरल्या. ते पाहताच भाजप कार्यकर्ते तिथून पळू लागले. त्यावर ममता 'आता का पळताय, आता द्या घोषणा' असे म्हणत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान, भाजप या व्हिडिओद्वारे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तृणमूलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तशी पोस्ट करण्यात आली आहे.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.