ETV Bharat / bharat

चार तासांच्या आत कामावर रुजू व्हा... अन्यथा कारवाई, ममतांचा संपकरी डॉक्टरांना इशारा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संप तसेच धरणे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना चार तासांच्या आत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आले. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ममतांचा संपकरी डॉक्टरांना इशारा
author img

By

Published : Jun 13, 2019, 7:29 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संप तसेच धरणे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना चार तासांच्या आत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आले. या आदेशाचे पालन न करणाऱयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा ममतांनी दिला आहे.

बंगालमध्ये गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड परिणाम झाला आहे. याची दखल घेत कोलकात्यातील एसएसकेएम रुग्णालयासमोर निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांना तत्काळ परिसर रिकामा करण्याचे आदेश ममतांनी दिले. तसेच रुग्णालयात केवळ रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी सुरक्षा रक्षकांना दिले आहेत. या निदर्शनांमागे विरोधी पक्षांचा हात असल्याचा आरोप ममतांनी केला आहे. ज्युनिअर डॉक्टरांनी केलेला संप ही कम्युनिस्ट पक्ष आणि भाजपचे षडयंत्र असल्याचे त्या म्हणाल्या. बंगालचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते ममता बॅनर्जींकडे आहे.

कोलकात्यात एका डॉक्टरला झालेल्या गंभीर मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी निदर्शने सुरू केली आहेत. मंगळवारपासून सुरू असलेले आजपर्यंत सुरू आहे. डॉक्टरांनी आम्हाला न्याय पाहिजे अशा आशयाच्या घोषणा देत संप पुकारला आहे. मात्र, या आंदोलनात बाहेरच्या व्यक्ती समाविष्ट झाल्या असून हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळण्याची मागणी केली आहे. या सर्व गदारोळात बंगालची आरोग्य सुविधा मात्र प्रचंड विस्कळीत झाली आहे.

Intro:Body:

rahul s

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.