ETV Bharat / bharat

हिंमत असेल तर समोर या...ताफा अडवून 'जय श्रीराम'च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर धावून गेल्या ममता

ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये धरणे आंदोलन सुरू केले आहे. अशाच एका धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या नैहाटी शहराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांचा ताफा अडवण्यात आला.

ममता बॅनर्जी
author img

By

Published : May 31, 2019, 9:37 AM IST

कोलकाता - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचे रौद्र रुप गुरुवारी पाहायला मिळाले. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातून ममता यांचा ताफा जात असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांना डिवचत 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. त्यामुळे भडकलेल्या ममता गाडीतून उतरत घोषणा देणाऱ्यांवर धावून गेल्या. "हिंमत असेल तर समोर येऊन घोषणा द्या" असे आव्हान त्यांनी घोषणा देणाऱ्यांना केले.

ताफा अडवून 'जय श्रीराम'च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर धावून गेल्या ममता

लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध म्हणून ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये धरणे आंदोलन सुरू केले आहे. अशाच एका धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या नैहाटी शहराकडे निघाल्या होत्या. त्यांचा ताफा भाटपारा शहरातून जात असताना काही कार्यकर्त्यांनी ममतांचा ताफा अडवत 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. यामुळे संतापलेल्या ममता गाडीतून खाली उतरत त्या कार्यकर्त्यांवर धावून गेल्या. "हिंमत असेल तर समोर या, माझा अपमान करण्याची तुमची हिंमतच कशी झाली, मला माहित आहे तुम्ही या राज्यातील नाहीत, मी हे खपवून घेणार नाही, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा त्यांनी त्या कार्यकर्त्यांना दिला.

सध्या बंगालमध्ये भाजप विरूद्ध ममता यांच्यात चांगलाच संघर्ष पेटला आहे. ममतांनी मोदींच्या शपथविधीकडेही पाठ फिरवली. भाजपविरोधात त्यांनी बंगालमध्ये धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी त्यांचे राज्यभर दौरे सुरू आहे. काल (३० मे) ज्या मतदारसंघात हा प्रकार घडला तो मतदारसंघात भाजपच्या अर्जुन सिंह यांचा गड मानला जातो. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या दिनेश त्रिवेदी यांचा पराभव केला आहे.

ममतांनी सुरक्षा रक्षकांना ताफा अडवणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेण्यास सांगितले आहे. तुम्हाला चांगलाच धडा शिकवते, असे म्हणत त्या तेथून नैहाटीकडे रवाना झाल्या. नैहाटी येथील धरणे आंदोलनातही त्यांनी घडलेल्या प्रकराबद्दल संताप व्यक्त केला. हीच यांची लोकशाही आहे का? असा सवालही त्यांनी केला.

Intro:Body:

somnath

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.