मालकानगिरी (ओडिशा) - गावात रुग्णवाहिका जायला रस्ता नसल्याने डॉक्टरने रुग्णाला लाकडाच्या खाटेवरून चक्क पाच किलोमीटर उचलून रुग्णवाहिकेपर्यंत नेल्याचे समोर आले आहे. आोडिशाच्या नक्षलग्रस्त मालकानगिरी जिल्ह्यातील अतिदुर्गम गावात ही घटना घडली आहे.
शक्ती प्रसाद दास, असे डॉक्टरचे नाव आहे. या गावातील एका रुग्णाला रुग्णालयात घेऊन जायचे होते. मात्र, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग असल्याने या गावात जाण्यासाठी अद्यापपर्यंत रस्ता नाही. डॉक्टर शक्ती प्रसाद दास यांना गावकऱ्यांनी देखील सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांनी रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने त्या रुग्णाला लाकडाच्या खाटेवरून पाच किलोमीटर पर्यंत पायी चालत रुग्णवाहिकेपर्यंत आणले.