नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीमध्ये भाजपच्या लोकसभा सदस्य प्रज्ञा ठाकूर यांचाही समावेश करण्यात आला आहे. या २१ सदस्यीय समितीचे प्रमुख केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असणार आहेत.
प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांना प्रकृतीच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) त्यांच्यविरूद्ध मकोका कायद्यांतर्गत असलेले गुन्हे मागे घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
भोपाळच्या खासदार असलेल्या प्रज्ञा यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव केला होता. सध्या त्यांच्याविरूद्ध अनेक गुन्ह्यांसाठी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत खटला चालू आहे.
हेही वाचा : अमित शाहंनी राज्यसभेत मांडला जम्मू-काश्मीरचा लेखाजोखा; सर्व काही सुरळीत असल्याचा दावा