हैदराबाद - तेलंगाणात आज (बुधवार ) सकाळी भीषण अपघात झाला. हा अपघात बोअरवेल ट्रक आणि कारमध्ये झाला. यात सात जण जागीच ठार झाले आहेत. चार जण जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे. मृतामध्ये एका सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. हा अपघात रंगारेड्डी जिल्ह्यातील मलकपूर जवळ झाला.
दहा जण करत होते प्रवास
कारमध्ये एकूण दहा जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व मृत आणि जखमी हे रंगारेड्डी जिल्ह्यातील तडबूंडचे रहिवासी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुर्णपणे चक्काचुर झाला आहे.
मृतांची नावे पुढील प्रमाणे
या अपघातात मृत झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. असीफ खान वय ५० वर्षे, सानीया वय १८ वर्षे, नाझिया बेगम वय ४५ वर्षे, हर्षा वय २८ वर्षे, नाझिया बानू वय ३६ वर्षे आणि हर्ष बानू वय ६ वर्षे अशी मृतांची नावे आहेत. तर करीना बेगम, अयुम खान, निझार बेग, अन्वर खान आणि खालीद अशी जखमींची नावे आहेत.
उत्तर प्रदेशातही भीषण अपघात
उत्तर प्रदेशातील कडाधाम गाावात लग्नासाठी आलेले वऱ्हाड परतत असताना झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. हा अपघात ट्रक आणि स्कॉर्पीओमध्ये झाला. यावेळी गाडीत एकूण ९ जण होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी ६ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी हा अपघात झाला.
हेही वाचा - वाळूने भरलेला ट्रक चारचाकीवर पलटला, ६ जणांचा जागीच मृत्यू