ETV Bharat / bharat

विकास करा पण...वाचा महात्मा गांधींचे पर्यावरण अन् विकासाच्या मुद्द्यांवरील परखड मत - निसर्ग आणि गांधीजी

महात्मा गांधींना साधेपणाने राहायला आवडायचं. निसर्गावर जास्त भार टाकणं त्यांच्या नियमामध्ये बसत नव्हते. कमीत कमी संसाधनांचा गांधी जास्तीत जास्त वापर करायचे आणि त्याबद्दल नोंदही ठेवायचे.

महात्मा गांधी
author img

By

Published : Sep 8, 2019, 8:02 AM IST

नवी दिल्ली - महात्मा गांधीच्या जीवन काळादरम्यान पर्यावरण संरक्षण हा काही मोठा प्रश्न नव्हता. तरीही पर्यावरण आणि विकासाबाबत त्यांची मते स्पष्ट होती. निसर्गला विनाशापासून वाचवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे गांधीजींच्या विचारामध्येच सामावलेले होते. गांधीजींचे विकासाचे आणि निसर्ग संरक्षणाबाबतचे विचार शाश्वततेच्या संकल्पनेवर आधारित होते. निसर्गावर जास्तीचा बोजा टाकणे त्यांच्या विचारामध्ये कधीही नव्हते.

स्वातंत्र्य काळात स्वदेशी चळवळीमधून गांधीजींनी यंत्राद्वारे उत्पादित केलेल्या वस्तूंवर बहिष्कार घातला. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने कापडावर बहिष्कार घातला. वस्तूंचे यंत्राद्वारे उत्पादन घेताना कामगारांचे शोषण होते असं गांधीजी मानायचे. साध्या पद्धतीने हाताने बनवलेले कपडे घालायला गांधीजींना आवडायचे. यंत्राद्वारे तयार झालेल्या वस्तू वापरण्यास गांधीजींचा विरोध होता.

हेही वाचा - आधुनिक प्रबोधनाचे नवे मार्ग शोधताना : गांधी आणि टागोर

गांधीजींची विकासाची कल्पना शोषणाच्या तत्वावर आधारीत नव्हती. यंत्राच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. यंत्र वापरामुळे सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन होते, म्हणून गांधीजींचा विकासाच्या कल्पनेमध्ये यंत्रांवर आधारित उद्योगांना थारा नव्हता. सद्यस्थितीत सुरू असलेल्या विकासाच्या कल्पनेच्या अगदी उलट कल्पना गांधीजींची होती. मात्र, आताच्या नेत्यांनी गांधीजींनी सुचवलेल्या मार्गाकडे डोळेझाक केली आहे. विकासाची अशाश्वत पद्धत आताच्या सरकारकडून राबवली जात आहे.

हेही वाचा - लखनऊच्या जनाना पार्कशी जुळल्या आहेत गांधीजींच्या अनेक आठवणी

महात्मा गांधींना साधेपणाने राहायला आवडायचे. निसर्गावर जास्त भार टाकणे त्यांच्या नियमामध्ये बसत नव्हते. कमीत कमी संसाधनांचा गांधी जास्तीत जास्त वापर करायचे आणि त्याबद्दल नोंदही ठेवायचे. गाईंच संरक्षण म्हणजेच त्यांचा आदर अशा दृष्टीकोनातून ते गायीकडे पाहायचे. गाईचे दूध हे तिच्या वासरासाठी असते म्हणून गांधीजी गाईचे दूधही पिणे टाळायचे. नंतर डॉक्टर आणि पत्नी कस्तुरबांच्या मोठ्या आग्रहानंतर त्यांनी शेळीचे दूध पिण्याचे मान्य केले होते.

(लेखक संदीप - लेखकाचे विचार वैयक्तिक आहेत, त्यांचा ईटीव्ही भारतशी काहीही संबध नाही.)

Intro:Body:

महात्मा गांधींचे पर्यावरण आणि विकासाच्या मुदद्यांवर मत 

नवी दिल्ली - महात्मा गांधीच्या जीवन काळामध्ये पर्यावरण संरक्षण हा काही मोठा प्रश्न नव्हता, तरीही पर्यावरणाबाबत आणि विकासाबाबत त्यांची मतं स्पष्ट होती. निसर्ग विनाशापासून वाचवणं आणि पर्यावरणाच रक्षण करणं हे गांधीजीच्या विचारामध्येच सामावलेलं होतं. गांधीजींचे विकासाचे आणि निसर्ग संरक्षणाबाबतचे विचार शाश्वततेच्या संकल्पनेवर आधारित होते. निसर्गावर जास्तीचा बोजा टाकण त्यांच्या विचारामध्ये कधीही नव्हते.   

स्वातंत्र्य काळात स्वदेशी चळवळीमधून गांधीजींनी यंत्राद्वारे उत्पादित केलेल्या वस्तूंवर बहिष्कार घातला. त्यामध्ये प्रामुख्याने कापडावर त्यांनी बहिष्कार घातला. वस्तूंचे यंत्राद्वारे उत्पादन घेताना कामगारांचे शोषण होते असं गांधीजी मानायचे. साध्या पद्धतीने हाताने बनवलेले कपडे घालायला गांधीजींना आवडायचं. यंत्राद्वारे तयार झालेल्या वस्तू वापरण्यास गांधीजींचा विरोध होता.

गांधीजींची विकासाची कल्पना शोषणाच्या तत्वावर आधारीत नव्हती. यंत्राच्या वापरामुळे पर्यावरणाचं नुकसान होते. यंत्र वापरामुळे सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन होते, म्हणून गांधीजींचा विकासाच्या कल्पनेमध्ये यंत्रांवर  आधारीत उद्योगांना धारा नव्हता. सद्यस्थितीत सुरू असलेल्या विकासाच्या कल्पनेच्या अगदी उलट कल्पना गांधीजींची होती. मात्र, आताच्या नेत्यांनी गांधीजींनी सुचवलेल्या मार्गाकडे डोळेझाक केली आहे. विकासाची अशाश्वत पद्धत आताच्या सरकारकडून राबवली जात आहे. 

महात्मा गांधींना साधेपणाने राहायला आवडायचं. निसर्गावर जास्त भार टाकण त्यांच्या नियमामध्ये बसत नव्हते. 

कमीत कमी संसाधनांचा गांधी जास्तीत जास्त वापर करायचे आणि त्याबद्दल नोंदही ठेवायचे. गाईंच संरक्षण म्हणजेच त्यांचा आदर अशा दृष्टीकोणातून ते गायीकडे पहायचे. गाईचं दुध हे तिच्या वासरासाठी असंत म्हणून गांधीची गाईच दुधही पीणे टाळायचे. नंतर डॉक्टर आणि पत्नी कस्तुरबाच्या मोठ्या आग्रहानंतर त्यांनी शेळीचं दुध पिण्याच मान्य केलं होत.    

लेखक संदीप

लेखकाचे विचार वयक्तीक आहेत, ईटीव्ही भारतशी कुठलाही संबध नाही 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.