नवी दिल्ली : वाढते शहरीकरण आणि शहरांच्या शहरांच्या बकाल अवस्थेकडे कुमार केतकर यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेवरही टीका केली. स्मार्ट सिटी योजनेतही शहरांच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या योजनेत जुने प्रकल्प नवे भासवून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे असे केतकर म्हणाले. दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीवरूनही त्यांनी केंद्रावर टीका केली. या माध्यमातून संसदेच्या पुरातन वास्तुचा वारसा पुसण्याचे तसेच इतिहासही पुसण्याचे काम केले जात आहे. या योजनेवर 20 हजार कोटींची उधळपट्टी केली जात आहे. संसदेच्या नवीन इमारतीमुळे दिल्लीचे विद्रुपीकरण होणार असल्याची टीकाही केतकर यांनी केली. कुमार केतकर यांनी मराठीतून त्यांचे निवेदन सादर केले. यावेळी सभापती व्यंकय्या नायडूंनीही तुम्ही चांगले बोलले आहात, धन्यवाद असे म्हणत त्यांचे कौतुक केले.
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? - शिवसेना
10:17 February 08
कुमार केतकर यांची शहरांच्या बकालीकरणावरून केंद्रावर टीका