लखनऊ - लव्ह जिहाद प्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी आरोपींना राम नाम सत्य है चा इशारा देत त्याविरोधात कायदा करण्याचा विचार व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याला अखिल भारतीय आखाडा परिषदने पाठिंबा दर्शवला आहे. आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करून कारवाई करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा लव्ह जिहाद च्या आरोपींना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
पुढील पिढ्याही लक्षात ठेवतील-
महंत नेरंद्र गिरी म्हणाले, की लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना अशा प्रकारचा दंड मिळायला पाहिजे की, त्यांच्या येणाऱ्या पिढ्या देखील ती शिक्षा लक्षात ठेवतील. लव्ह जिहाद सारख्या विषयाला गांभीर्याने घ्यायला हवे. कारण हा विषय गुन्हेगारीच्या श्रेणीमध्ये मोडला जातो. लव्ह जिहाद च्या माध्यमातून काही मुस्लीम युवक कपाळावर गंध लावून, हातात कंडे बांधून आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अडकवून हिंदू माता भगिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्यांची फसवणूक करत आहेत.
लग्न करून देतात सोडून-
लव्ह जिहादच्या टोळीतील युवक भोळ्याभाबड्या हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करतात. त्यानंतर धर्म परिवर्तन करण्यासाठी जबरदस्ती करतात. यामुळे हिंदू तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त होते. धर्म परिवर्तानाला नकार दिल्यास अनेक हिंदू मुंलीची हत्या होते किंवा त्यांना सोडून दिले जाते. या प्रकारचे काही घटना समोर आल्या असल्याचेही महंत म्हणाले.
उच्च न्यायालयाने नोंदवले मत-
महंत पुढे म्हणाले, उच्च न्यायालयानेही एका प्रकरणाचा निकाल देताना केवळ लग्नासाठी धर्म परिवर्तन योग्य नसल्यचे मत नोंदवले आहे. तसेच या लव्ह जिहाद सारख्या वाढत्या घटनांमागे कुठेतरी एक संगठित व्यवस्था काम करत आहे. यामध्ये मुस्लिम धर्मगुरु आणि मौलानांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे.
हिंदू मुलींना आवाहन-
लव्ह जिहाद प्रकरणावर बोलताना महंत यांनी हिंदू तरुणांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या आईवडिलांनी निवडलेल्या मुलासोबतच लग्न करायला हवे. तसेच तरुणींचे कोणासोबत प्रेम प्रकरण असेल तर त्या तरुणाची पूर्ण माहिती मिळवायला हवी. कुटुंबातील सदस्यांसोबत विचार विनिमय केल्यानंतरच लग्नासारखे महत्वाचा निर्णय घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी महंत गिरी यांनी गेल्या १५ ते २० वर्षापासून सरकारचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष्य आहे. त्यामुळे लव्ह जिहाद प्रकरणे करणाऱ्यांचे मनोबल उंचावले असल्याचे म्हणत खंत व्यक्त केली. तसेच संताबरोबर संमस्त हिंदू समाज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी लवकरात लवकर कायदा करण्याचे आवाहन करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.