ETV Bharat / bharat

राजीव गांधींची मारेकरी नलिनीची पॅरोल मुदतवाढ मागणी न्यायालयाने फेटाळली - राजीव गांधींची मारेकरी

पॅरोलची मुदत संपल्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत पॅरोल वाढवून मिळावा, अशी मागणी नलिनीने न्यायालयात केली होती, मात्र, ती फेटाळण्यात आली आहे.

राजीव गांधींची मारेकरी नलिनी
author img

By

Published : Sep 12, 2019, 12:02 PM IST

चेन्नई - मद्रास उच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्येतील आरोपी नलिनीला पॅरोलची सुट्टी वाढवून देण्यास नकार दिला आहे. मुलीच्या लग्नासाठी नलिनीला न्यायालयाने पॅरोल मंजूर केला होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत पॅरोल वाढवून मिळावा, अशी मागणी तिने न्यायालयात केली होती, मात्र, ती फेटाळण्यात आली आहे.

  • Madras High Court has refused to extend the parole granted to Nalini, a convict in Rajiv Gandhi assassination case. She had filed a plea to seek extension of parole till October 15. (File pic) pic.twitter.com/huUCLqUC0U

    — ANI (@ANI) September 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली आरोपी नलिनी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आली होती. मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी नलिनीने ६ महिन्यांच्या सुट्टीसाठी अर्ज केला होता. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने नलिनीला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता.

५ जुलैला न्यायालयाने पॅरोलची मागणी मान्य केली होती. मात्र, ६ महिन्यांऐवजी ३० दिवसांची सुट्टी मंजूर केली. कोणत्याही आरोपीला २ वर्षांतून एकदा पॅरोल मंजूर केला जातो. मात्र, मला २७ वर्षाच्या तुरुंगवासात एकदाही सुट्टी मिळाली नाही, असे नलिनीने अर्जात म्हटले होते.

१९९१ साली निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधीची हत्या करण्यात आली होती. आत्मघाती हल्लेखोराने राजीव गांधीना भेटण्याच्या बहाण्याने जवळ येत स्फोट घडवून दिले होते. यामध्ये राजीव गांधीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ७ दोषींना अटक करण्यात आली होती. पेरारीवलन, मुरुगन, नलिनी, शांतन, रविचंद्रन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस या कटात सहभागी असल्याने तुरुंगात आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.